Top News नागपूर महाराष्ट्र

“उद्धव ठाकरे म्हणतात 25 वर्षे आम्ही सत्तेत राहू, मग आम्ही काय करायचं”

नागपूर | महाविकास आघाडी सरकार 5 नाही तर 25 वर्षे टिकणार असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात 25 वर्षे आम्ही सत्तेत राहू मग आम्ही काय करायचं?, असा मिश्किल सवाल रामदास आठवलेंनी केला आहे. त्यासोबतच मुंबई  महापालिका निवडणूकही आम्ही जिंकणार असल्याचं आठवले म्हणाले.

पुढची विधानसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी आमचा मार्ग साफ असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिकेत भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्र लढणार असल्याचंही आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये चालू असलेलं शेतकरी आंदोलनावर बोलताना आठवले म्हणाले, केंद्राच्या कृषी कायद्यात शेतकऱ्यांना नको ते सांगावं त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

“देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय?”

‘ही तर ठाकरे सरकारची हुकूमशाही’ म्हणत भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

विजय मल्ल्या कंगाल; वकिलाची फी देण्यासाठीही नाहीत पैसे

उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात!

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली; रूग्णालयात उपचार सुरु

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या