पुणे | बांगलादेश, पाकिस्तान येथील घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढण्याची घेतलेली भूमिका योग्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला समर्थन करण्याची भूमिका घ्यायला हवी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेना भूमिका घेत नाही, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. आठवलेंनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
सीएए आणि एनआरसीबाबत देशातील मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हा कायदा नागरिकत्व देणारा असून हिरावणारा नाही, असंही आठवलेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून, ते सीएए, एनआरसीच्या पाठिंब्यासाठीच अप्रत्यक्षपणे मोर्चा काढत आहेत, अशा शब्दांत आठवलेंनी राज ठाकरेंचं अभिनंदन केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा एक नाटक होतं”
खरे सावरकर समजायला अनेक जन्म घ्यावे लागतील- विक्रम गोखले
महत्वाच्या बातम्या-
माझ्या भाषेमुळे अपमान झाला असेल तर क्षमा मागतो- आशिष शेलार
दिल्लीत प्रचाराला गेलेल्या चंद्रकांत पाटलांची केजरीवालांवर सडकून टीका
शेलारांनी शब्द जरा जपून वापरावेत; सुप्रिया सुळेंचा सल्ला
Comments are closed.