नरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले

मुंबई | राफेल प्रकरणात दाखल केलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावत पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चीट दिली आहे, असं म्हणत न्यायालायाच्या निर्णयाचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केलं आहे.

अंतिम विजय सत्याचाच होतो हे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं सिद्ध झालं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

राफेल प्रकरणावरुन काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करत होती, मात्र ते निष्कलंक असल्यांच सिद्ध झालं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेसच्या प्रचाराला भुलणार नाही, जनतेचा नरेंद्र मोदींवर विश्वास आहे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-नरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी

-सायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात

-रवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर

-सोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार?

-“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी