बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काॅंग्रेसवालो मत लो मोदीजीसे पंगा…”, रामदास आठवलेंनी सादर केली कविता

नवी दिल्ली | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता दोन्ही सभागृहात चर्चा चालू आहे. अर्थसंकल्पावर चर्चा करताना संसदेत मोदींनी काॅंग्रेसवर जोरादार टीका केली होती. त्यानंतर देशभर वातावरण तापलं होतं. आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून राज्यसभेत हशा पिकवला आहे.

रामदास आठवले आपल्या अजब-गजब कवितांच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करण्यात आठवले माहिर आहेत. अशात आता त्यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करताना काॅंग्रेसवर निशाना साधला आहे. 2022-23 चा निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आहे विकासाची गंगा, असं आठवले म्हणाले  आहेत.

काॅंग्रेसवालो मत लो मोदीजीसे पंगा, मत भुलो वरलिया रंगा, नही तो संकट आ जाएगा अंगा, अशी टीका आठवले यांनी काॅंग्रेसवर केली आहे. काॅंग्रेसने किया भारत को भकास, मोदीजीने किया भारत का विकास, या शब्दात आठवले यांनी मोदींची पाठराख केली आहे. आठवले यांनी आपल्या या कवितेच्या ओळीनं सर्वांना पोट धरून हसायला भाग पाडलं आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पावरून राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहात जोरदार वाद रंगला आहे. महिला, शेतकरी, युवा वर्ग, बेरोजगारी या मुद्द्यांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला नसल्याची टीका विरोधकांनी सरकावर केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! ‘या’ कारणामुळे सलामीवीर KL Rahul संघाबाहेर

“कुणीतरी हिजाबच्या मागं जातंय, कुणीतरी… महत्त्वाचं काय? देश की धर्म?”

“संजय राऊत तुम्ही फक्त फडणवीसांच्या घराबाहेर याच, मग आम्ही बघू”

“शरद पवार साहेबांना माझा शब्द…”; जयंत पाटलांनी दिल्या ‘प्राॅमिस डे’च्या हटके शुभेच्छा

मोठी बातमी! राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिने कारावासाची शिक्षा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More