बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना को मत डरो ना…’; रामदास आठवलेंच्या कवितेनं राज्यसभेत एकच हशा

नवी दिल्ली | कवी मनाचे नेते म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना ओळखलं जातं. आठवले यांच्या कविता नेहमीच मिश्कील आणि मजेशीर असतात. संसदेत कित्येक वेळा आठवले यांच्या कवितांनी नरेंद्र मोदींसह इतर बड्या नेत्यांना हसू आवरता आलं नाही. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेनात त्यांनी कोरोनावर आणखी एक कविता सादर केली आहे.

आठवलेंची कविता-

कोरोना की आ गई है महामारी, जाग गई है दुनिया की जनता सारी,

परेशान रही गाव गाव की नारी, मेरे उपर भी आ गई थी अॅड्मिट होणे की बारी,

सभी देश ने बजाई थी टाली ( मोदीजी के आवाहन पर), फिर सरकार को क्यु दे रहे हो गाली,

कोरोना की वो रात थी बोहोत ही काली, फिर हमारे सरकार को क्यु दे रहे हो गाली,

कोरोना को मत डरो ना…, कोरोना से मत हारो ना, कोरोना को जलदी मारो ना, कोरोना को बरबाद करो ना.

नरेंद्र मोदीजी ने कोरोना काल मे बहोत ही काम किया था अच्छा, इस लिये खुश है गाव गाव की माँ और बच्चा,

नरेंद्र मोदीजी माणूस बोहोत ही है सच्चा, राजनीती मै वो नही है कच्चा.

रामदास आठवले राज्यसभेचे खासदार आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांची कविता सादर केली. कविता सादर केल्यानंतर राज्यसभेत एकच हशा पिकला. याआधी त्यांनी कोरोनाच्या पाश्वभूमीवर ‘गो कोरोना गो’ चा नारा दिला होता. त्यांच्या या नाऱ्याची सर्वत्र चर्चा झाली होती. मी ‘गो कोरोना’चा नारा दिला होता. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून आला. आता, ‘नो कोरोना नो कोरोना’चा नारा देत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान,  सध्या दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. 19 जुलै ते 13 ऑगस्टच्या दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. 25 दिवस चालणाऱ्या अधिवेशनाचे दोन दिवस पूर्ण झाले आहेत. या दोन्ही दिवशी विरोधकांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. तर पेगॅसस प्रकरणामुळे आज देखील काँग्रेस आक्रमकपणे संसदेत मुद्दे मांडणार असण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या-

मास्क घालणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी पुण्यात मास्क लावलाच!

“पतीच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्या परिस्थितीतून जात असेल, याची कल्पनाही करु शकत नाही”

लाईव्ह मॅचदरम्यान या व्यक्तीने महिलेसोबत केलं वाईट कृत्य; व्हिडीओ व्हायरल

5 वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या आली 400च्या खाली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More