बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकत्र आले उद्धव आणि नारायण राणे, मला आठवतंय महायुतीचे गाणे”

सिंधुदुर्ग | राज्यातील सिंधुदुर्ग मधील बहुचर्चित चीपी विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्यातील इतर मंत्री आणि आमदारांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात केंद्रीय राजमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कवितेच्या दोन ओळी सादर केल्या. याठिकाणी एकत्र आलेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे, मला आठवतेय महायुतीचे गाणे, अशी काव्यशैली रामदास आठवले यांनी सादर केली आहे.

नारायण राणेंनी मला आधीच सांगितलं आहे की, माझं आणि उद्धव ठाकरेंचे काहीच वैर नाही. उद्धव ठाकरेंनी सुद्धा नारायण राणे यांच्यासोबत काम केलं आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती होती तेव्हा मी देखील उद्धवजींच्या सोबत काम केलं आहे, असं आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमात आठवलेंनी म्हटलं आहे की, चिपी विमानतळाच्या योगदानात सर्वच राजकीय नेत्यांचा सहभाग आहे. या कार्यक्रमात आठवलेंनी पुन्हा युती व्हावी हीच इच्छा बोलून दाखवली आहे.

थोडक्यात बातम्या –

“मी इथलं सौंदर्य पाहिलंय, कोकणाला जागतिक पर्यावरण केंद्र बनवणार”

राणे-ठाकरे मंचावर, संधी साधून सुभाष देसाईंनीही केला राणेंवर प्रहार!

चिपी विमानतळावर राजकीय राडा; उद्धव ठाकरेंनी राणेंना मारले इतके टोमणे!

“शिवसेनेतील ‘या’ नेत्यांवर नजर ठेवा”; भरसभेत राणेंचा उद्धव ठाकरेंना खळबळजनक सल्ला

“कोकणच्या मातीत काही बाभळी जन्माला आल्यात”; पहिल्याच वाक्यात ठाकरेंचा प्रहार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More