बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदी यांना हरवणं शिवसेना किंवा शरद पवारांचं काम नाही”

मुंबई | संजय राऊत यांनी पेट्रोलचे दर कमी करण्यावरून केलेल्या टीकेमुळे राजकारण पेटल्याचं दिसत आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर भाजपचे चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, यांच्यानंतर आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

रामदास आठवले म्हणाले, नरेंद्र मोदी यांना हरवणं शिवसेना किंवा शरद पवार यांच काम नाही. दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला मात्र, केवळ सहानभूतीच्या लाटेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. या यशाने शिवसेनेने भारावून जाऊ नये, असा प्रतिहल्ला आठवलेनीं संजय राऊतांवर केला आहे.

आठवले धुळ्यात बोलत होते. त्यांनी बोलताना यावेळी धुळ्यात भाजपचे आमदार जयकुमार रावल हे पुन्हा आमदार होतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी सामन्यातूनही पेट्रोलचे दर कमी करण्यावरून केंद्र सरकारला फटकारलं होतं. त्यानंतर मात्र भाजपच्या नेत्यांनी संजय राऊत आणि राज्य सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे.

दरम्यान, राऊत यांनी जर पोटनिवडणकीत भाजपला पराभूत करून पेट्रोल 5 रुपयाने स्वस्त होत असेल तर पेट्रोल 50 रुपयाने स्वस्त करण्यासाठी संपूर्ण देशात आपल्याला भाजपचा पराभव करावा लागेल आणि 2024मध्ये ते नक्कीच होईल, अशी टीका केली होती. त्यावर रामदास आठवलेनीं प्रत्युत्तर दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत चढउतार सुरूच, जाणून घ्या आजची आकडेवारी

‘मला हटवलं नाही तर मी…’, समीर वानखेडेंनी दिलं स्पष्टीकरण

शाब्बास पुणेकर! पुण्यात आज एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्युची नोंद नाही

समीर वानखेडे यांना हटवल्यानंतर नवाब मलिकांचं पहिलं ट्विट, म्हणाले…

जाणून घ्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची ताजी आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More