बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सेनेचा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकलाय”

नांदेड | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले आहे. शिवसेनेचा वाघ हा काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या पिंजऱ्यात अडकला असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. नांदेडमध्ये लोहा तालुक्यातील शिवनी जामगा गावात ते बोलत होते.

शिवनी जामगा या गावात बौद्ध कुटुंबावर सामूहिक हल्ला करण्यात आला होता. याच पार्श्वभुमीवर रामदास आठवले यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि ठाकरे सरकार दलितांवर होत असलेले अत्याचार रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमुळे मवाळ भुमिका घ्यावी लागत असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.

महाराष्ट्रात तीन पक्षाचं मिळून सरकार आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी शिवसेनेचा हा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकून पडला आहे. संजय राठोड यांचा राजीनामा केवळ राज्यातील विरोधीपक्षाने आणलेल्या दबावामुळे घेतला आहे. तसेच आम्ही धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेण्यासाठी आग्रही असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या दोन पक्षातील मंत्र्यांचे प्रकरण बाहेर आले आहेत आणि आता तिसऱ्या पक्षातील प्रकरणही लवकरच बाहेर येईल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. ही तीन पक्षाची आघाडी सत्तेच्या मोहापायी एकत्र आली आहे आणि यांचं सरकार फारकाळ टिकणार नाही असं भाष्यही यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे.

थाेडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण प्रकरणात समोर आला पुणे पोलीस आयुक्तांचा अत्यंत धक्कादायक व्हिडीओ

आणीबाणी ही काँग्रेस सरकारची चुक होती- राहुल गांधी

धक्कादायक!; मंत्र्याचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं एकच खळबळ

छप्पन इंच छातीचे पंतप्रधान असताना खासदारच असुरक्षित- नाना पटोले

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More