अहमदनगर | कृषी कायद्यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतलं, तर लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
रामदास आठवले आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आठवलेंनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं आहे.
नवीन कृषी कायद्यांना काळे कायदे का म्हणता. त्यात काय काळं आहे ते दाखवून द्या, असं आव्हान रामदास आठवले यांनी विरोधकांना दिलं आहे.
भारतातील आघाडीचे उद्योजक असलेल्या अदानी आणि अंबानी यांचा संबंध कृषी कायद्यांशी जोडणे योग्य नाही. ते चुकीचे आहे. अदानी आणि अंबानी यांचे व्यवसाय वेगळे आहेत. कृषीमालावर ते अवलंबून नाहीत. या कायद्यामुळे ते कृषी मालाची खरेदी करण्यासाठी पुढे येतील असं नाही, असं रामदास आठवले म्हणालेत. आंदोलक शेतकऱ्यांची कृषी कायदेच मागे घ्यावेत, अशी ठाम मागणी असून, ती पूर्णपणे अयोग्य आहे, असं रामदास आठवले म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
जेनेलिया देशमुखने शेअर केला बेडवर डान्स करतानाचा व्हीडिओ, पाहा व्हीडिओ
“ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या”
‘तिच्या वेदना पाहून मी…’; नवऱ्याने ‘व्हॅलेंटाईन डे’ला पत्नीला गिफ्ट केली किडणी
‘…तिथे तिथे मी नडणार आणि भिडणारच’; चित्रा वाघ आक्रमक
“फुकटचं दिलं तर लोकांना वाटतं गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे”
Comments are closed.