मुंबई | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईचे प्रमुख रामदास आठवले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केलं आहे.
रामदास आठवले यांनी शिवसेना, भाजप आणि रिपाईची युती तुटल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. भविष्यात तिन्ही पक्षांनी एकत्र येत पुन्हा एकजूट करणं ही बाळासाहेब ठाकरेंना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना आठवलेंनी व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन! त्यांच्या स्वप्नातील शिवशक्ती भीमशक्ती भाजप एकजूट आम्ही साकारली. पण नंतरच्या काळात ती तुटली त्याची खंत वाटते, असं आठवले म्हणालेत.
दरम्यान, भविष्यात पुन्हा ती एकजूट उभारावी हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल, असं ट्विट रामदास आठवले यांनी केलंय.
महत्वाच्या बातम्या-
बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना फडणवीसांचा शिवसेनेला टोला; म्हणाले…
माझ्या मुलाने गायक होऊ नये आणि झाल्यास भारतात काम करू नये- सोनू निगम
“मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं बाळासाहेबांचं एक स्वप्न पूर्ण; दुसरं स्वप्न आम्ही पूर्ण करू”
…म्हणून सोनिया गांधींनी पंतप्रधानपदी मनमोहन सिंग यांना निवडलं- बराक ओबामा
नितीश कुमार फक्त नामधारी मुख्यमंत्री, भाजपा त्यांना पिळून फेकून देईल; माजी मंत्र्याची टीका