पुणे | कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे.
रामदास आठवले यांनी कोरेगाव आज भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केलं. यानंतर रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हा इतिहास पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाला, तर तो सर्व मुलांनाही कळेल, असं आठवले म्हणाले. तसेच आपण यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करू, असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2021 मध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित आदिवासी, ओबीसी आणि सवर्ण या सर्वांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करेल, असंही आठवले म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
कोरोना लशीच्या तात्काळ वापराला मंजुरी मिळणार?; तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू
‘….तेव्हा भाजपला नामकरण करायला कोणी रोखलं होतं?’; काँग्रसेचा भाजपला सवाल
1 जानेवारी हा सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस- प्रकाश आंबेडकर
‘हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय’; कंट्रोल रुममध्ये फोन करणाऱ्या पुणेकरांना सुखद धक्का
सोशल मीडियावर दीपिकानं उचललं धक्कादायक पाऊल; चाहतेही झालेत हैराण