महाराष्ट्र मुंबई

लाजिरवाण्या पराभवाचा इतिहास पुसून टाकण्यासाठी तयारीला लागा- रामदास आठवले

मुंबई | मुंबई महानगरपालिकाच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी आता रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानं शड्डू ठोकला आहे.

गेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत आपल्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. या लाजिरवाण्या पराभवाचा इतिहास पुसून टाकण्यासाठी तयारी लागा, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलं आहे.

एम आय जी क्लब येथे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वीतयारीसाठी रिपाईच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत रामदास आठवले बोलत होते.

आगामी मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्र आव्हान उभं करेल. त्यांच्या विरुद्ध भाजप आणि आरपीआय युती करून लढेल. भाजपचा महापौर आणि आरपीआयचा उपमहापौर करण्यासाठी भाजपसोबत आरपीआयचे उमेदवार निवडून आणणं आवश्यक आहे. यासाठी आपापले वॉर्ड निश्चित करुन आतापासून कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी करावी, असे आदेश रामदास आठवले यांनी दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘मला माझ्या नवऱ्याकडं जायचंय’, चिमुकलीच्या बालहट्टाने तुम्हीही पोट धरून हसाल; पाहा व्हिडीओ

‘हा’ नेता सत्तेत असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही- विनायक मेटे

“मराठा-धनगर एकत्र आल्यास, दिल्लीची गादी हस्तगत करु”

…तर आज काश्मिरी तरुण IAS आणि IPS अधिकारी असते- अमित शहा

“शिवजयंती धूमधडाक्यातच झाली पाहिजे, कुठलं सरकार आम्हाला थांबवू शकत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या