मुंबई | आमची चौकशी खुशाल करा, जे असेल ते बाहेर येईल, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे चांगले उद्योजक आहेत. त्यांनी जर काही केलं नसेल, तर त्यांनी घाबरण्याची गरज नाही, असं रामदास आठवले म्हणाले.
राज्यातील सरकार पाडण्यासाठी आम्हा या यंत्रणांचा वापर करत नाहीयेत. संजय राऊत म्हणतात आमच्याही चौकशा करु, त्यांनी जरुर चौकशी करावी. जे सत्य असेल ते बाहेर येईल, असं म्हणत आठवलेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय.
प्रताप सरनाईक यांनी शासकीय यंत्रणांना तपास करु द्यावा, असं आठवले म्हणालेत. तसेच या यंत्रणा कोणाच्याही विरोधात नाहीत, असं आठवलेंनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून आम्ही महाराष्ट्रद्रोही काय?- देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत, ते तर…- चंद्रकांत पाटील
“अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडी अधिक बळकट होईल”
“फक्त गाण्याचा एक कार्यक्रम ठेवा, मग कराची आपलीच”
‘शाळा सुरु करा, आमचं नुकसान होतंय’; विद्यार्थ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना मेसेज