बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जे आहे मराठा समाजाचे खणखणीत नाणे, त्याचं नाव नारायण राणे- रामदास आठवले

मुंबई | नवी मुंबईतील राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेला केंद्रीयमंत्री आणि रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली. या बैठकीत रामदास आठवले यांनी कवितेतून भाजप नेते नारायण राणेंचं कौतुक केलं आहे.

जे मराठा समाजाचं आहे खणखणीत नाणे, त्याचे नाव नारायण राणे, अशा शब्दात आठवलेंनी नारायण राणे यांचं कौतुक केलंय. महाविकास आघाडीचं काम आहे फक्त खाणे, पण आमचं काम आहे मराठा आरक्षणाचं गीत गाणे, असं म्हणत रामदास आठवेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तसेच, मराठा आरक्षणासाठी रिपाइंसह भाजपचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी म्हटलं.

नवी मुंबईतील राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेस आठवले यांनी उपस्थिती लावली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, आयोजक सुरेश पाटीलसह राज्यभरातील अनेक मराठा समाज आरक्षणासाठी लढणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी या परिषदेस उपस्थित होते.

दरम्यान, नारायण राणेंनी बैठकीदरम्यान अनिल देशमुखांवरील कारवाईवर प्रतिक्रिया दिली. करावं तसे भरावं, आता भरण्याची वेळ आहे. तसेच ही कायदेशीर कारवाई आहे, राजकीय नाही, असं नारायण राणे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

‘…मग संजय राऊतांच्या छातीत धडकी का भरली’; चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका

‘मी फार वर्ष असले उद्योग केलेत’; बिगर भाजप आघाडीबाबत शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

‘परमबीर आयुक्त पदावर होते त्यावेळी…’; ईडीच्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

“सुप्रियाताईंची धडपड केविलवाणी, लोकसभा निवडणुका नसल्याने ताई पुण्यात जास्त नसतात”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More