“प्रकाश आंबेडकर जर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले तर….”

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या. वंचित बहुजन विकास आघाडीचा नेमका रोल काय असेल, याची चर्चा सुरू आहे. आता या संभाव्य युतीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका केली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते. यावेळी त्यांनी या युतीत भिमशक्ती नाही, असं म्हटलं आहे.

आंबेडकरांची शक्ती ही ‘वंचित शक्ती’ आहे. ‘एकनाथ शिंदे यांची खरी शिवशक्ती’ असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र येण्याच्या मुद्द्यावर ‘त्या’ शक्तीला मी भीमशक्ती मानत नाही. कारण, सगळी शक्ती माझ्याबरोबर असून, ती वंचित शक्ती आहे, अशी टीका आठवलेंनी केली आहे.

मी सध्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांबरोबर असल्याने शिवशक्ती आणि भीमशक्ती याठिकाणी आहे. दुसऱ्या शिवशक्ती आणि भीमशक्तीचा विषयच येत नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष आहेत. त्यामुळे तीन पक्षात चौथा पक्ष म्हणून वंचित आघाडी येणार की, ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-