कोल्हापूर | आज आमच्या जातीवर अन्याय होत आहे. त्यामुळे जातीच्या आधारावरच आरक्षण असलं पाहिजे. तुम्ही जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवं आहे. पण आर्थिक निषकावर आरक्षण देता येत नसल्याने जातीच्या आधारावच आरक्षण असावं, रामदास आठवले म्हणालेत.
देशात कोणत्या जातीचा किती टक्का आहे, हे आता समजत नाही. प्रत्येक जातीची जनगणना होणे गरजेचे आहे. त्यामुळे 2021 ची जनगणना जात निहाय होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेणार असल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. पण काही संघटनांकडून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना सरकारविरोधात भडकवले जात आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.
थोडक्यात बातम्या-
राहुल गांधींसह विरोधी पक्षाचे 5 बडे नेते राष्ट्रपतींना भेटणार!
…म्हणून आम्ही पवार साहेबांना भेटलो- रत्नाकर गुट्टे
शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये येण्यास तृप्ती देसाई यांना बंदी!
कृषी कायद्यावर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लागेल- मेधा पाटकर
“…तर तो खऱ्या अर्थाने डिसले गुरुजींचा सत्कार ठरला असता”
Comments are closed.