महाराष्ट्र मुंबई

…म्हणून मी शरद पवारांकडे आलो- रामदास आठवले

मुंबई | महाराष्ट्रात सत्तासंघर्ष तीव्र झालेला असतानाच विविध पक्षांचे नेते एकमेकांच्या भेटीला जाताना दिसत आहेत. आता रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.

‘सिल्व्हर ओक’मधील शरद पवारांच्या निवासस्थानी आठवलेंनी पवारांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

पवारांचा राजकीय सल्ला घेण्यासाठी आलो होतो, अशी माहिती रामदास आठवलेंनी दिली. तर सेना-भाजपात मध्यस्थी करा, असा सल्ला पवारांनी आठवलेंना दिल्याचं कळतंय. रामदास आठवलेंनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.

दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढत चालला आहे. 50-50 फॉर्म्युलावरुन दोन्ही पक्षांमध्ये सत्तासंघर्ष सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या