महाराष्ट्र मुंबई

चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा- रामदास आठवले

मुंबई | जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा मोठा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळानं घेतला आहे. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुडाचं राजकारण मात्र करु नये, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

सुडापोटी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला आहे. चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

धार्मिक स्थळं सुरु करण्याची आमची मागणी आहे. आम्ही त्यासाठी आंदोलनही केले. परंतु उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली आहेत. शिवसेना आज फडणवीस सरकारमध्ये असती तर ही वेळ नसती आली, असंही आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“मदरशांचं अनुदान तुम्ही सत्तेत असताना बंद का केलं नाही?”

‘ओला दुष्काळ जाहीर करा’; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

“परतीच्या पावसाने होत्याचं नव्हतं करुन टाकलं, केंद्राने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी”

महिलांसाठी खुशखबर; उद्यापासून महिलांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या