बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकारने पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील गरिबांना मदत करावी”

मुंबई | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना अनेक घोषणा केल्या. यामध्ये 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली. याआधी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्य सरकारला टोला हाणला आहे.

18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस आणि गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा स्वागतार्ह निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे केंद्रावर टीका करणारे महाविकास आघाडीचे तोंड बंद झालं आहे. महाविकास आघाडीने त्वरित मदत करावी, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

गरिबांचं दुःख ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याण अन्नयोजनेद्वारे देशभरातील 80 कोटी गरिबांना दिवाळीपर्यंत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आणि गरिबांप्रती त्यांची कटीबद्धता दाखवणारा निर्णय आहे, अशा शब्दात आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

दरम्यान, रामदास आठवलेंनी ठाकरे सरकारला लगावलेल्या टोल्याला सरकारकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्याक बातम्या- 

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनामुक्तीच्या दिशेने पुणेकरांचं पहिलं पाऊल, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

कोरोना सेंटरमध्ये साप घुसल्यानं उडाली खळबळ, अन्….

लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक असेल?; एम्सच्या संचालकांनी दिली माहिती

पंतप्रधानांसोबतच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नेलं असतं तर….- देवेंद्र फडणवीस

ठाकरे आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच- संजय राऊत

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More