बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून आता आमच्यासोबत येत आहेत एकनाथ शिंदे”

नवी दिल्ली | महाराष्ट्रात सुरु असलेले राजकीय नाट्य दिवसेंदिवस वेगळी वळणे घेत आहे. यावर सर्वच स्तरातून टीका-टिप्पणी होत आहे. काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्ह येत आपलं मत सांगितलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी देखील वेळोवेळी ट्विट करत आपली बंडाची कारणे सांगितली. संजय राऊत यांनी देखील सर्व आमदार परत येतील असा विश्वास व्यक्त केला.

यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत एकनाथ शिंदे यांच्यावर कविता म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेचे बंद केलेले आहे ज्यांनी धंदे; त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे..

एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे खंदे,

आणि आता ते राहिले नाहीत अजिबात अंधे,

म्हणून आता आमच्यासोबत येत आहेत एकनाथ शिंदे’, अशी कविता करत रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

आता जसं आठवले म्हणतात तसं खरंच एकनाथ शिंदे शिवसेना सोडून भाजपशी युती करत सत्ता स्थापन करणार की, परत घरवापसी करणार हे पाहणं आगामी काळात महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

शिवसेेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना!

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

‘पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी…’, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

‘मला एकाच गोष्टीचं वाईट वाटलं…’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक

‘सरकारचा फायदा घटक पक्षांना, शिवसैनिक मात्र फक्त भरडला गेला’; एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More