बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ज्या शिवसेनेने केलाय घात, त्यांचा..’ भाजप उमेदवाराच्या प्रचारात आठवलेंची खास शैलित शेरेबाजी

नांदेड | देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. आपला उमेदवार निवडून यावा यासाठी सगळ्याच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तर आता भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या विजयासाठी भाजप आणि मित्रपक्ष मैदानात उतरले आहेत. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले हे साबणे यांच्या प्रचारासाठी पुढे आले आहेत. साबणे यांचा प्रचार करताना आठवलेंनी त्यांच्या खास शैलीतून तुफान फटकेबाजी केली आहे.

सुभाष साबणे यांच्या प्रचार सभेत बोलताना आठवले यांच्यातील कवी जागा झाला आणि आठवलेंनी कवितेतून तुफान फटकेबाजी करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना सुभाष साबणेला गद्दार म्हणते मग तुम्ही गद्दारी केली नाही का?, असा परखड सवाल आठवले यांनी उपस्थित केला आहे. तर आठवलेंनी ‘ज्या शिवसेनेने केलाय घात, त्यांचा तोडून टाकावा लागेल हात’ अशी कवितेतील ओळ म्हणताच सगळीकडे एकच हशा पिकला.

रामदास आठवलेंनी साबणे यांच्या प्रचाराची सुरूवातही कवितेतूनच केली. मी इथे आलो नाही मिरवण्यासाठी, मी आलो आहे जिंकण्यासाठी, ज्यांनी जिंकली लोकांची मने, त्यांचे नाव सुभाष साबणे, असं म्हणत आठवलेंनी साबणेंच्या प्रचाराची सुरूवात केली. आठवलेंनी त्यांच्या तुफान फटकेबाजीने ही सभा जिंकली. तर मी आणि फडणवीस एकत्र आलो की सीट जिंकून येते, असा विश्वासही आठवलेंनी सभेत बोलताना व्यक्त केला.

आठवले पुढे म्हणाले की, उद्धवजी नको तिथे गेले म्हणून माझे संबंध त्यांच्याशी बिघडले. संजय राऊत म्हणतात सरकार 5 वर्ष टिकेल पण सरकारला शेतकऱ्यांप्रती कळवळा नाही, मराठा आरक्षण देण्याची संधी असूनही ते देत नाहीत. 50 टक्क्यांच्या पुढे जात नसेल तर सत्ता सोडा, आम्ही बघतो, अशी जहरी टीकाही आठवलेंनी केली आहे. पुढे ते म्हणाले की, साबणे तुम्ही निवडून येणार. या सरकारने खड्डे बुजवले नाही तर हे त्याच खड्ड्यात जाणार, अशी टीकाही आठवलेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

आगामी महापालिका निवडणुकीतील युतीबाबत जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य!

“शमी त्यांना माफ कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत”

“नरड्यावर पाय देऊन एफआरपी रक्कम वसुल केल्याशिवाय सोडणार नाही”

“मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते”

“बायको आणि सासुबरोबर तुम्हालाही जेलमध्ये जायचंय का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More