Loading...

…अन् पोलिसानंच रामदास आठवलेंना ऐकवली कविता

लातूर | केंद्रीय मंत्री रामदास आठवले आपल्या कवितांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. लातूरच्या दौऱ्यावर असताना मात्र त्यांना एक पोलीस भेटला आणि त्यानेच आठवलेंना एक कविता ऐकवली.

दिलीप लोभे असं त्यांचं नाव असून ते पोलीस नाईक आहेत. त्यांनी आठवलेंवरच केलेली कविता सादर केली. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील जय नगर येथे हा प्रकार घडला.

Loading...

काय आहे कविता?

आले मंत्री रामदास आठवले

Loading...

म्हणून आम्हाला बंदोबस्ताला पाठवले

शेतकऱ्यांविषयीचे प्रेम त्यांच्या हृदयात साठवले…

साहेब तुमचा कोणता का असेना पक्ष

आम्ही बंदोबस्तात आहोत दक्ष

Loading...

तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नात घाला लक्ष…

तुम्ही मोठे मी आहे छोटा कवी

ही बाब नाही नवी

पण आजच्या या काळात शेतकऱ्यांना तुमची साथ हवी…

महत्वाच्या बातम्या

-पंकजा मुंडेंनी छावणी माफियांना पाठीशी घालू नये; विनायक मेटेंचा सल्ला

-यज्ञ करुन भगव्या दहशतवादाचं पाप धुतलं जाणार नाही; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

-विद्यार्थी आक्रमक; मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह पोहोचले दिल्लीत

-…नाहीतर मी सरकारकडे बघून घेतो; शरद पवारांचा इशारा

-काँग्रेसचे 20 आमदार आजही भाजपमध्ये प्रवेश करायला तयार- बी. एस. येडियुरप्पा

Loading...