…अखेर रामदास आठवलेंना दिल्लीत मनाजोगता बंगला मिळाला!

नवी दिल्ली | सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राजधानी दिल्लीत अखेर मनाजोगता बंगला मिळाला आहे. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांच्या निधनामुळे रिक्त झालेला ११, सफदरजंग रोड हा बंगला आठवलेंना देण्यात आलाय. 

गेल्या तीन वर्षांपासून आठवलेंचा मुक्काम नव्या महाराष्ट्र सदनात आहे. मनाजोगता बंगला मिळत नाही अशी त्यांची तक्रार होती.

दरम्यान, यापूर्वी आठवलेंनी माजी मंत्री मुरली देवरा, ई. अहमद, विजय दर्डा यांचे मोकळे झालेले बंगले नाकारले होते. पुरेशी हिरवळ नाही, अडगळीत आहे, अशा कारणांमुळे त्यांनी हे बंगले नाकारल्याचं कळतंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या