मुंबई | जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाचे दोन संशयित सापडले आहेत. अशातच खासदार रामदास आठवलेंचा कोरोनाविरोधात घोषणाबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
गो कोरोना… गो… गो कोरोना… गो, अशा घोषणा रामदास आठवले देताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तसेच त्यांच्यासोबत काही चीनी नागरिक देखील घोषणा देताना दिसत आहेत.
महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्ण नुकतेच दुबईला जाऊन आल्याचीही माहिती मिळत आहे.
दुबईहून आलेल्या या रुग्णांना तातडीने नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करुन तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु
माझ्याकडे जन्माचा दाखला नाही मग मी काय जीव देऊ का?; मुख्यमंत्र्यांचा मोदी-शहांना सवाल
महत्वाच्या बातम्या-
कोरोनामुळे पुण्यातील आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना!
आता गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा- जितेंद्र आव्हाड
“अजित पवारांना शपथ घेताना देवेंद्र फडणवीस चांगले वाटले होते”
Comments are closed.