Top News विधानसभा निवडणूक 2019

निवडणुकीत महायुतीला 240 ते 250 जागा नक्की मिळणार- रामदास आठवले

Loading...

पुणे | विधानसभा निवडणुकीत महायुतीला 240 ते 250 जागा नक्की मिळणार आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तर मला आनंद होईल, असं वक्तव्य केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्व नेते प्रचाराच्या कामाला लागले आहेत. यातच आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांना चिमटे काढले आहेत. तर सत्ताधारी भाजपचे तोंडभरुन कौतुक केलं आहे.

Loading...

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची जादू अजून कायम आहे. त्यामुळे महायुतीला चांगले दिवस आहेत. महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये चांगले यश मिळणार असून 240 ते 250 जागा मिळतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

भाजपने मला राज्यसभा सदस्य केलं आहे. त्यामुळे मी भाजपच्या जवळ आहे. राजकारणात मान अपमान विसरुन पुढे जावं लागतं, असंही आठवले म्हणाले आहेत.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या