…आणि रामदास आठवलेंनी कार्यक्रमातून पळ काढला!

गाझियाबाद | केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी संविधान बदलण्याची भाषा केल्यामुळे तरुणांनी हंगामा घातला, ज्यामुळे उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कार्यक्रमातून पळ काढावा लागला. 

गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जेव्हा रामदास आठवले बोलण्यास उठले तेव्हा उपस्थित युवकांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. आयोजकांनी तरुणांना आवरण्याचा प्रयत्न केला मात्र गोंधळ वाढत गेल्याने आठवले यांना कार्यक्रम सोडावा लागला. 

पाहा व्हिडिओ-