बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तेव्हा विचारलं ‘गो कोरोना’ म्हणून जाईल का? अन् आता सगळेच म्हणतात गो कोरोना- रामदास आठवले

मुंबई |  गो कोरोना हा नारा केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला होता. त्यांच्या या नाऱ्याची बऱ्याचश्या लोकांनी खिल्ली देखील उडवली. पण त्यांचा हाच नारा आता प्रसिद्ध होत आहे आणि चर्चेत देखील राहत आहे.

20 फेब्रुवारी रोजी जेव्हा देशामध्ये करोनाचा जास्त प्रादुर्भाव झाला नव्हता तेव्ही मी ‘गो करोना करोना गो’चा नारा दिला होता. त्यावेळेस अशा घोषणांनी करोना जाणार आहे का असा सवाल लोकांनी उपस्थित केला होता. मात्र आता जगभरामध्ये ही घोषणा दिली जात आहे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी आपल्या घराबाहेर दिवे पेटवले. या सगळ्या कार्यक्रमानंतर त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांना आपण दिलेल्या घोषणेची आठवण झाली.

दरम्यान, रविवारी रात्री दिवे लावण्याबरोबरच अनेक ठिकाणी लोकांना भारत माता की जय, वंदे मातरम् यासारख्या देशभक्तीपर घोषणाही दिल्या. काही ठिकाणी शुभंकरोती कल्याणम् सारखी गाणी लावण्यात आली होती. अनेक ठिकाणी लोकांनी बाल्कन्यांमधून ‘गो करोना गो…’च्या घोषणाही दिल्या.

ट्रेंडिंग बातम्या-

अब_आगे_क्या; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा मोदींवर निशाणा

कोरोनाला पळविण्यासाठी भाजपच्या महिला अध्यक्षाचा हवेत गोळीबार, पाहा व्हिडीओ

महत्वाच्या बातम्या-

“मोदींनी मला चर्चेला न बोलवणं म्हणजे हा औरंगाबादच्या आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान”

अकलेचे दिवे लावणे यालाच म्हणतात, सचिन सावंतांचा भातखळकरांवर निशाणा

मुस्लिम समाजानेही फ्लॅशलाइट लावून दिला एकजुटीचा संदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More