Top News महाराष्ट्र राजकारण

शरद पवारांनी एनडीएमध्ये येऊन नरेंद्र मोदींसोबत काम करावं, केंद्रीय मंत्र्याचं निमंत्रण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा. तसंच पवार यांनी ‘एनडीए’त सामील होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करावं, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय.

रामदास आठवले यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीला ‘एनडीए’त सामील होण्याचं निमंत्रण दिलंय. शिवसेनेला पाठिंबा देऊन राष्ट्रवादीचा काहीच फायदा नाही. त्यामुळे शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याचा विचार करणं आवश्यक आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितलंय.

या व्हिडीयोमध्ये रामदास आठवले म्हणतात, “शरद पवार यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला आणि देशाला फायदाच होईल. राज्यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती तयार झाली तर ती प्रचंड शक्तीशाली असेल. त्यामुळे शरद पवार यांनी शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा.” हे मत वैयक्तिक असल्याचंही आठवले यांनी स्पष्ट केलंय.

“शरद पवार राज्यातील अत्यंत कर्तव्यदक्ष नेते आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर विविध प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे देशाचा विकास करण्यासाठी आपण उद्योगक्षेत्रात पडलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली आहे,” असंही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

राजभवनात कोरोनाचा शिरकाव…राज्यपालांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात…

‘लवकरात लवकर जयपूरला या…’ दिल्लीत ठाण मांडलेल्या आमदारांना मुख्यमंत्री गेहलोतांचे आदेश

धारावी कोरोनामुक्तीचं श्रेय सरकारचं नसून RSSचं, स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून काम केलं- चंद्रकांत पाटील

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, सचिन तेंडुलकरचं लगोलग ट्विट, म्हणतो…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या