क्रिकेटमध्ये अनुसूचित जातींना २५ टक्के आरक्षण द्या- आठवले

नागपूर | केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले चमत्कारिक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आताही त्यांनी असंच एक चमत्कारिक वक्तव्य केलंय.

क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये अनुसूचित जातींना २५ टक्के आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केलीय. नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

शासकीय नोकरीत आरक्षण आहे मग खेळांमध्ये का नाही, असा सवालही त्यांनी विचारला. दरम्यान, काल बडोद्यात बोलताना त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताच्या पराभवाची चौकशी करण्याची मागणी केली होती.