कोरेगावमध्ये उसळलेला हिंसाचार पूर्वनियोजित- रामदास आठवले

पुणे | 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा गावात उसळलेला हिंसाचार पूर्वनियोजित होता, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

सणसवाडीतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्यासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या आहेत, असं ते म्हणाले. अॅट्रॉसिटी रद्द होणार नाही, त्यामुळे दलितांना आपले मित्र माना, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, रामदास आठवले यांनी जिग्नेश मेवानीवरही टीकास्त्र सोडलं. जिग्नेशला मोठा नेता व्हायचं असेल तर त्याने भडकावू भाषणं करु नयेत, असं ते म्हणाले.