Top News महाराष्ट्र मुंबई

‘मराठ्यांसह ‘यांनाही’ आरक्षण द्या’; रामदास आठवलेंची मागणी

मुंबई | राज्याता मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आरक्षणाबाबत एक मागणी केली आहे. संसदेत बोलताना आठवलेंनी ही मागणी केली आहे.

ज्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्यात आलं तसंच मराठा,जाट, राजपूत आणि ठाकूर यांना आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.

ज्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहेत त्याप्रमाणे हरियाणात जाट, राजस्थानमध्ये राजपूत आणि उत्तर प्रदेशात ठाकूर समाजालाही आरक्षण हवं असल्याचं  आठवलेंनी सांगितलं. त्यासोबकत त्यांनीन  2021 ची जणगणना ही जातीच्या आधारे व्हायला पाहिजे, असंही आठवले म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला 8 मार्चला सुरू होणार असून 18  मार्चपर्यंत ही सुनावणी पार पडणार आहे.

थोडक्यात बातम्या-

रिहानाचा ख्रिस गेलसोबतचा ड्रेसिंगरूममधील व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

…म्हणून राष्ट्रवादीच्या पदवीधर अध्यक्षाने थेट कॅनडाच्या पंतप्रधानांनाच लिहिलं पत्र

कृषी कायद्यात काय कमतरता हे शेतकरी नेत्यांना सांगता आलं नाही- नरेंद्रसिंह तोमर

“आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणं?, हे केंद्र सरकारला शोभत का?”

…हे पहिले केंद्राला सांगा’; अजित पवारांनी फडणवीसांना फटकारलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या