बारामती | मराठा, धनगर समाजासह ज्यांची ज्यांची मागणी आहे अशा सर्वांना आरक्षण मिळावे अशीच आपली भूमिका आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. फक्त इतर आरक्षणांना धक्का लावता कामा नये, असं ते म्हणाले.
दलित आणि सवर्णांमध्ये आरक्षणावरुन तेढ निर्माण होता कामा नये. शिक्षण आणि नोकरीच्या मुद्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, असं ते म्हणाले.
दरम्यान, दलित आणि मराठा बांधवांनी एकत्र येऊन सामाजिक तेढ निर्माण न करता हा प्रश्न सोडविला पाहिजे. मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाचा अहवाल लवकर द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
-राज्यात आता कुत्रेही सुरक्षित नाहीत; भाजप आमदाराचा कुत्रा चोरीला!
-पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन- खासदार अमर साबळे
-शरद पवारांवरुन काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत घमासान
-आधीच्या सरकारला जे जमलं नाही, ते आम्ही करुन दाखवलं- मोदी
-व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमिनला जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी सक्तीची
Comments are closed.