बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन्यथा मनसैनिकांविरोधात भीमसैनिक रस्त्यावर उतरतील!

मुंबई | प्रामाणिकपणे पैसे कमावणाऱ्या फेरीवाल्यांना मारहाण करण्यापेक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांनी सीमेवर जाऊन शत्रूंना मारावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलाय. ते मुंबईत बोलत होते.

ठाणे आणि मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना चोप दिला. त्यावर ते बोलत होते.

फेरीवाल्यांना मारहाण केल्यास मनसैनिकांविरोधात भीमसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी राज ठाकरे यांना दिलाय.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More