राजस्थानच्या निकालाबद्दल रामदास आठवलेंचं भाकीत, पाहा काय म्हणाले…

जयपूर | राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी सत्ताबदल होतो, मात्र यंदा ही परंपरा खंडीत होणार आहे, असं भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. ते अलवारमधील मुंडावर मतदारसंघात प्रचारसभेत बोलत होते. 

राजस्थानमध्ये पुन्हा मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या नेतृत्वात भाजप-रिपाइंचे सरकार येईल. लोकांनी रिपाइंच्या उमेदवारालाच मतदान करावे, असं ते म्हणाले. 

5 वर्षांच्या काळात मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी चांगलं काम केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा राजस्थानमध्ये दिसेल, असंही ते यावेळी म्हणाले. 

दरम्यान, राजस्थानमध्ये 14 जागांवर रिपाइंने स्वबळाचा नारा दिला आहे. तर 186 जागांवर भाजपला पाठिंबा दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-पालकमंत्री दाखवा अन् हजार रुपये मिळवा; बुलडाण्यातील अजब प्रकार

-आता मी बघतो किती लोक वाचतात; नरेंद्र मोदींचा गांधी परिवाराला इशारा

-‘लोग कहते है मैं शराबी हूं’ गाण्यावर भाजप आमदाराचा बेधुंद डान्स

-…मग अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांकडून सल्ला घ्यायला पाहिजे होता!

-मराठा आरक्षणावर लगेचच सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार