मनसे आणि रिपाइं एकत्र येण्याचा पर्यायच आता शिल्लक!

मुंबई | मनसे आणि रिपाइं या दोनच पक्षांच्या सभा प्रचंड मोठ्या होतात. मात्र मतं काही पडत नाहीत. त्यामुळे मनसे आणि रिपाइं एकत्र येण्याचा पर्यायच आता शिल्लक राहिला आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. 

रामदास आठवले यांच्या मातोश्रींचं नुकतंच निधन झालं. त्यानिमित्ताने बुधवारी राज ठाकरे यांनी त्यांची भेच घेतली आणि आठवले यांचं सांत्वन केलं.

दरम्यान, पक्ष वेगळे असले किंवा विचारधारा वेगळ्या असल्या तरी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची महाराष्ट्राची परंपरा असल्याचंही आठवले म्हणाले.