महाराष्ट्र मुंबई

‘गावा-गावातली बोलत आहे पारु’; कविता करत आठवलेंनी ठाकरे सरकारकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई | ‘गावा-गावातली बोलत आहे पारु माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु’ अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरे सरकारकडे वाईन शॉप्स सुरु करु नका, अशी मागणी केली आहे.

माझं राज्य सरकारला निवेदन आहे, की लॉकडाउनच्या कालखंडात अनेक लोक जे दारु पित होते, नशा करणारे होते. दारुची दुकानं बंद असल्याने त्यांची दारु बंद झाली आहे. त्यामुळे दारुची दुकानं सुरु करणं योग्य राहणार नाही, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

अनेक लोकांचे उद्ध्वस्त होणारे संसार सावरले जात आहेत. अनेक घरांमधल्या महिला खुश आहेत. गावा-गावतली म्हणू लागली आहे पारु आता माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु. अशा पद्धतीचं आनंदाचं वातावरण महिलांमध्ये आहे. छोट्याश्या महसुलासाठी दारुची दुकानं सुरु केली तर मद्यपान करणाऱ्या लोकांना वाव मिळेल, असं आठवले म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी पत्र पाठवून राज्य सरकारने महसुलासाठी वाईन शॉप सुरु करण्याचा विचार करावा अशी सूचना केली होती. त्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीकाही करण्यात आली.

 

ट्रेंडिंग बातम्या-

गृहमंत्री अनिल देशमुखांनी आजीबाईंना स्वत: घातला मास्क

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या