बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब!

मुंबई | भाजप पक्षाने राज्यसभेसाठी माझी उमेदवारी निश्चित केली आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भाजपकडून राज्यसभेवर जाणाऱ्या दोन नावांपैकी एक नाव निश्चित झालं आहे, तर दुसरं नाव काय असेल याबाबत उत्सुकता आहे.

विधानभवनात येऊन रामदास आठवले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपने राज्यसभेसाठी माझी उमेदवारी निश्चित केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

भाजपकडून आठवले यांचं नाव निश्चित झालं असल्याने दुसरा उमेदवार कोण असेल याबाबत वेगवेगळे तर्क लावले जाऊ लागले आहेत. भाजपकडून उदयनराजे भोसले आणि संजय काकडे ही नावं चर्चेत आहेत. त्यामुळे कुणाला संधी मिळते हे पाहावं लागेल.

दरम्यान, महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी भाजपमध्ये चुरस असल्याचं पाहायला मिळत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

एनपीआर आणि एनआरसी महाराष्ट्रात नको- नवाब मलिक

इतिहासात एकाही हिंदू राजाने मस्जिद तोडली नाही- नितीन गडकरी

महत्वाच्या बातम्या-

40 दिवसांत एका एकरातून शेतकऱ्यानं कमवले 3 लाख 60 हजार रुपये!

‘देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत’; भुजबळांच्या ‘त्या’ मागणीवर फडणवीसांचं उत्तर

सुप्रिया सुळे वृत्त निवेदिकेच्या भूमिकेत; सांगितली अजित पवारांबाबातची बातमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More