भाजपकडून रामदास आठवलेंना मोठा ठेंगा; एकही जागा सोडणार नाही!

मुंबई | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआयसाठी एकही लोकसभेची जागा सोडणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजप उमेदवारांची नावं संसदीय समितीनं एकमतानं मंजूर केली आहेत. तसेच यंदा २०१४ पेक्षा मोठी लाट असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजप आरपीआयसाठी एकही जागा सोडणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे रामदास आठवले याप्रकरणी काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

दरम्यान, एकही जागा न सोडल्याने रामदास आठवले सेना-भाजपवर नाराज आहेत. सेना-भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला तेव्हाच आठवलेंनी दोन्ही पक्षांना इशारा दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंनी कुठेही एक जागा लढावी आणि डिपॉझिट वाचवून दाखवावं- विनोद तावडे 

-कतरिनाला सलमान खानने 65 लाखांची कार गिफ्ट केल्याची चर्चा!

तरुण दिसण्यासाठी मायावती फेशियल करतात- भाजप आमदार

-भाजप सत्तेत आल्यापासून एकही दंगल नाही- योगी आदित्यनाथ

काँग्रेसकडून राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, ‘या’ मोठ्या नावांचा समावेश