मुंबई | ज्या संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांच्यावरच शिवसेनेने अन्याय केला. किमान त्यांना ‘सामना’चं संपादकपद तरी द्यायला हवं होतं, असं म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टोमणा मारला आहे.
आठवले यांनी यावेळी दिल्ली हिंसाचारावरही भाष्य केलं. दिल्ली पेटवण्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा हात आहे. आपच्या नगरसेवकाने दंगल भडकवली. काँग्रसने त्याला हातभारच लावला, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जर प्रांतवादाची भूमिका सोडली, तर त्यांचं महायुतीत स्वागत आहे, असं आठवले म्हणाले आहेत. तसेच राज यांच्या युतीत येण्याने किंवा न येण्याने महायुतीला काहीही फरक पडणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असणारे दैनिक सामनाचं संपादकपद रश्मी ठाकरे यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे संजय राऊत नाराज असल्याची चर्चा आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
बेडुक कितीही फुगला तरी… आशिष शेलारांची ‘राष्ट्रवादी’वर जहरी टीका
ज्यांच्या कमी जागा ते सत्तेत अन् ज्यांच्या जास्त जागा ते विरोधी पक्षात- राज ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
‘दादामियां’ तुम्ही गोधडय़ा भिजवत होता तेव्हा…; ‘सामना’तून चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र
“भाजपला संपवण्याची तयारी सुरू झाली आहे”
शिवसेना पक्ष नंबर वन राहिला पाहिजे- अजित पवार
Comments are closed.