कोल्हापूर | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांचे भारतात स्वागत आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यांग उन्नती योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना दिल्या जाणाऱ्या साहित्याचे वाटप आज सामाजिक न्याय मंत्री आठवले, आणि केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी रामदास आठवलेंनी विविध विषयांवर भाष्य केलं.
डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दौऱ्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त होतील, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी अशा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावईदेखील आले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
शेतकऱ्यांची ‘ती’ पत्रं घेऊन विरोधी पक्ष आज राज्यपालांची भेट घेणार- देवेंद्र फडणवीस
“देवेंद्र फडणवीस आपला ‘गजणी’ झालेला दिसतोय”
महत्वाच्या बातम्या-
अब की बार बाप-बेटे की सरकार; मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला
‘समृद्धी महामार्गात मोठा घोटाळा झाला’; पृथ्वीराज चव्हाणांचे फडणवीसांवर गंभीर आरोप
वारीस की लावारीस त्याला सोडणार नाही; देवेंद्र फडणवीस आक्रमक
Comments are closed.