महाराष्ट्र मुंबई

‘राजस्थानमध्ये भाजप सरकार येईल अन् महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरेंचं सरकार जाईल’; केंद्रीय मंत्र्याचा खळबळजनक दावा

मुंबई | राजस्थानमध्ये भाजपचं सरकार येईल आणि राजस्थाननंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार जाईल, असं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

सचिन पायलट यांचा काँग्रेसमध्ये वारंवार अपमान होत होता. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांना कधीच संधी दिली नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.

मध्यप्रदेशमध्येही ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबतही हेच घडलं होतं. त्यानंतर मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं सरकार गेलं. याचीच पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होईल आणि तिथे सचिन पायलट यांच्या मदतीने भाजपचं सरकार स्थापन होईल. सचिन पायलट यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामागे खंबीरपणे उभं राहावं, असं आठवले म्हणालेत.

मध्यप्रदेशात जे झालं तेच राजस्थानात होईल. राजस्थानात भाजपचं सरकार स्थापन झाल्यावर महाराष्ट्राची वेळ येईल. महाराष्ट्रातलं सरकार फार टिकणार नाही, असा दावा आठवलेंनी केलाय.

 

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज 6741 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

‘हे’ कारण देत कोरोना टेस्ट करण्यास रेखाने दिला नकार!

‘नागपुरातील हनीट्रॅप प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करा’; देवेंद्र फडणवीसांचं अनिल देशमुखांना पत्र

आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरातही १६ जुलैपासून लॉकडाऊन

पुण्यात जाणाऱ्या मार्गावर ‘या’ तीन ठिकाणी 24 तास होणार कडक तपासणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या