नवी दिल्ली | बेकायदा प्रतिबंधक हालचाली सुधारणा(UAPA) विधेयक आज राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. यावेळी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेत कविता करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.
आतंकवाद को खत्म करना है हमें, पाक अधिकृत काश्मीर को कब्जे में लेना है हमें, काश्मीर में रहकर पाकिस्तान जिंदाबाद बोलने वालों को सबक सिखाना है हमें, पाकिस्तान को ईंट का जवाब पत्थर से देना है हमें, इस बिल का विरोध करनेवाली काँग्रेस को सबक सिखाना है हमें, अशी कविता म्हणत रामदास आठवले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
राज्यसभेत या विधेयकावर मतदान घेण्यात आलं. त्यावेळी विधेयकाच्या बाजूने 147 मतं तर विरोधात 42 मतं पडली.
दरम्यान, या विधेयकाला मंजुरी मिळाल्याने NIA ला जास्तीत जास्त अधिकार मिळणार असून, संघटनेबरोबरच एखाद्या व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांनी आणखी मानसिक धक्क्यांची तयारी करावी -चंद्रकांत पाटील
–वीणाकडून राखी बांधून घे, शिवच्या आईचा शिवला सल्ला!
-“कामं केली असती तर यात्रा काढण्याची वेळच आली नसती”
-हर्षवर्धन पाटील माझ्याकडे तिकीट मागतायेत; जानकरांचा गौप्यस्फोट!
Comments are closed.