‘आम्हाला पण…’; रामदास आठवलेंच्या देवेंद्र फडणवीसांकडे मोठ्या मागण्या

Ramdas Athawale | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाशिक दौऱ्यावर असताना अनेक मुद्यांवर भाष्य केले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत.

महायुती सरकारमध्ये मंत्री पदाची आशा आहे. त्यांनी मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार करण्याची मागणी केली आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, असं आठवलेंनी सांगितलंय.

मंत्रिमंडळ विस्तारात RPI पक्षाला स्थान मिळावे. महामंडळ मिळावे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीने एकत्र लढावे. आम्ही सोबत आहोत, आम्हाला पण योग्य जागा मिळाव्या, अशा तीन मागण्या रामदास आठवले यांनी केल्या.

मंत्रिमंडळात आमचा मंत्री असेल असे वाटते, पण खाते मागितले नाही. कारण, मंत्रीपद मिळण्याची शक्यता वाटत नाही, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.

“Evm खराब म्हणणाऱ्यांचं डोकं खराब आहे”

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला जात आहे. याबाबत रामदास आठवले यांना विचारले असता विरोधकांना माझं आवाहन आहे की, रडीचा डाव खेळू नका. Evm खराब म्हणणाऱ्यांचं डोकं खराब आहे. लोकशाहीचा अपमान करू नका. आम्ही काँगेसच्या काळात evm खराब असल्याचे कधी म्हणालो नाही, असा म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ 25 वर्षीय अभिनेत्रीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू, नक्की काय घडलं?

मोठी बातमी! मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण; बड्या उद्योगपतीच्या मुलाचा प्रताप

‘ही’ अभिनेत्री अंडरवर्ल्ड डाॅनसोबत बांधणार होती लग्नगाठ, स्वतः केला खुलासा

कुणाचं ब्रेकअप तर कुणाचा घटस्फोट…; यंदा ‘या’ कलाकारांचा संसार मोडला

शिंदेंना गृहखात्यावर पाणी सोडावं लागणार?, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण