बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

नाशिक | फूट रिपाई मध्ये झाली होती. गवई, कवाडे आणि मी वेगवेगळ्या बाजूला गेलो. गवईकडे दोन खासदार असल्याने पक्षचिन्ह त्यांना मिळाले बाकी सर्व पक्ष माझ्या बाजूला होता. त्यामुळे या प्रकरणातही शिंदे यांच्या बाजूने बहुमत असल्याने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण हे देखील शिंदे यांच्याकडे राहील, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले यांनी केलं आहे.

नितीश कुमार भाजप सोडून गेल्याने एनडीएला काही फरक पडणार नाही. त्यांनी धोका दिला, त्यांचे आमदार फुटून परत येतील. भाजप मित्रपक्ष संपवतं, हे खरं नाही, माझा पक्ष वाढतोय, मला तसा अनुभव आला नाही, असं रामदास आठवले म्हणालेत.

शिवसेना वादात एकनाथ शिंदे यांची सरशी झाली आहे, खरी शिवसेना शिंदे यांची आहे, बरी शिवसेना उध्दव ठाकरे यांची आहे. मात्र यांच्या वादामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवून शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं आहे, असं रामदास आठवले म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“मी मोदींच्या पाठिशी आहे, त्यामुळे त्यांना घाबरण्याचं कारण नाही”

‘माझे स्तन तापसीपेक्षा मोठे आहेत’; अनुरागचं वक्तव्य चर्चेत

‘सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?’; अजित पवार संतापले

“शिंदे सरकार लोकशाही, संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं”

मोठी बातमी! महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More