महाराष्ट्र सोलापूर

‘या’ गावात रामदास आठवलेंचा सर्वांनाच धोबीपछाड!

सोलापूर | रिपाइं नेते रामदास आठवले यांनी अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीत त्यांचं पॅनल उतरवलं होतं. या ग्रामपंचायत निवडणुकीत या चारही पक्षाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या गटाने धूळ चारली आहे.

आरपीआयचे विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. गायकवाड यांनी या निवडणुकीचं अचूक नियोजन केलं होतं.

रिपाइंच्या पूर्ण पॅनलला मोठा विजय मिळाला आहे. बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीतील 7 पैकी 7 जागांवर गायकवाड यांच्या पॅनलची सत्ता आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात एकूण 657 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 67 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर 4 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे उर्वरीत 587 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले होतं.

थोडक्यात बातम्या-

‘एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही’; आपल्या मूळ गावात झालेल्या पराभावनंतर पाटलांची प्रतिक्रिया

भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी असलेल्या अंजली पाटील विजयी

‘घासून नाय, तर विरोधकांची ठासून’! मनसेने सेना-भाजप युतीला धूळ चारत ‘या’ ग्रामपंचायतीवर लावली विजयाची पताका

“संजय राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही”

माझ्या हाती राज्याचं स्टेरिंग भक्कम आहे- उद्धव ठाकरे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या