‘एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
नागपूर | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादीने (NCP) टीकेची झोड उठवली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टिचे (RPI) नेते रामदास आठवले (Ramdas Athawle) यांनी देखील राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
भोंगे अनेक वर्षांपासून आहेत. राज ठाकरेंनी मंदिरात भोंगे लावावेत पण दोन धर्मात तणाव निर्माण करू नये. राज ठाकरेंनी अनेकदा भूमिका बदलली आहे. त्यांच्या झेंड्याचा रंग बदलला, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.
‘एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे’, असा टोला रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना लगावला आहे. राज ठाकरे मोठे नेते आहेत. पण आपल्या देशात लोकशाही आहे पेशवाई नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा खोचक सल्ला देखील रामदास आठवलेंनी दिला आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे कधीही भोंगे काढा असं म्हणाले नाहीत. प्रत्येक पक्षाची मुस्लीम विंग आहे. त्यामुळे भोंगे काढायला लावणं बरं नव्हे. भोंगे काढायला रिपब्लिकन पक्षाचा विरोध असेल, असं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
राधे माँच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका
दिलासादायक ! एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
11 लाखांच्या पैठणीवरून ट्रोल करणाऱ्यांना आदेश भाऊजींनी फटकारलं, म्हणाले..
“चार दिवस काय चार वर्षे उद्धव ठाकरेंनी माझी चौकशी करावी, कारण…”
“मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळं तुम्ही कोणलातरी पकडून…”; संजय राऊतांचा हल्लाबोल
Comments are closed.