उदयनराजेंना आम्ही तिकीट देऊ आणि निवडून आणू- रामदास आठवले

मुंबई | उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना तिकीट देऊ आणि निवडून आणू, असं मत आरपीआयचे अध्यक्ष आणि सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. 

उदयनराजेंशी बोलणार होतो मात्र, ते सध्या दिल्लीत असल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा होऊ शकली नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, युतीने दक्षिण मुंबई आणि साताऱ्याची जागा आरपीआयसाठी सोडावी अशी जाहीर मागणी यावेळी आठवले यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुंबईत ‘टाईम्स नाऊ’ वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला

-…ही कागदपत्रं नसतील तर तुम्हाला घरपोच दारु मिळणार नाही!

-#MeToo | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

-साताऱ्याची जागा आरपीआयसाठी सोडावी; आठवलेंची उदयनराजेंकडे मागणी

-आम्ही 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकिस्तानची भारताला धमकी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा