बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांनी एनडीएत यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शरद पवारांच्या मोदी भेटीनंतर राज्यात सरकार अस्थिरता होईल की काय अशा चर्चा रंगल्या होत्या. आता या भेटीवर खुद्द शरद पवारांनी खुलासा केला होता. शरद पवार यांनी ट्विट करून या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शिवसेना आणि काँग्रेस देखील वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आहेत. त्यानंतर देखील आज ते सोबत आहेत. मग भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र का येऊ शकत नाहीत?. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं देशाचं संविधान विविध विचारांच्या लोकांना एकत्र आणणारं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी आपला निर्णय बदलावा अशी विनंती देखील त्यांनी केलीय. राज्यात शिवसेनेला दिलेला पाठिंबा त्यांनी काढून घ्यावा. काँग्रेस पक्ष देखील वारंवार तुम्हाला इशारा देत आहे. नाना पटोले हे शरद पवारांविरोधात वारंवार वक्तव्य करत आहेत. त्यामुळे शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं. पवारांनी आता एनडीएसोबत येण्याची वेळ आली आहे, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवारांमुळेच महाराष्ट्रात काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या ताकदीवर निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांचा विरोधकांनी बळीचा बकरा करू नये, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“आपल्या करिअरचं काही सांगता येत नाही, सेव्हिंग्स पाहिजेच”

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ‘एवढे’ लाख नागरिक बाधित होतील; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला अंदाज

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला पंतप्रधानांची फक्त 3 मिनिटांची हजेरी; विरोधक आक्रमक

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

राहुल-दिशाच्या लग्नानंतर आता राखी म्हणतेय, ‘पुढच्या वर्षी माझ्या लग्नाला यायचं’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More