मुंबई | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून टीका-टीप्पणीचे सत्र सुरु झाले आहे. केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंचा चेहरा होता नवा, म्हणून काही दिवस टिकली त्यांची हवा, असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली आहे.
विलेपार्ले येथील आंबेडकर नगरमध्ये भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पराग आळवणी यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा ठेवण्यात आली होती. यावेळी रामदास आठवले बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सत्ता मिळवण्यासाठी मतं न मागता विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी मतं मागत आहेत हे बरं झालं, मात्र त्यांची स्पर्धा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मिळणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत प्रचारसभा घेतली होती. यावेळी त्यांनी मला सत्ता नको, मला विरोधी पक्षनेतेपदाची संधी द्या, अशी मागणी महाराष्ट्राच्या जनतेकडे केली होती. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका करणे सुरु केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सोबत आले तर ठीक, नाही तर…- शरद पवार https://t.co/Bp1cANxPjV @PawarSpeaks @NCPspeaks #AssemblyElections2019
— थोडक्यात (@thodkyaat) October 11, 2019
“‘चंपा’ आणि ‘उठा’ हा तर शॉर्टफॉर्म आहे, त्यात काय आक्षेपार्ह” – https://t.co/w2uEp3n6u5 @AjitPawarSpeaks @ChDadaPatil
— थोडक्यात (@thodkyaat) October 11, 2019
शेतकऱ्यांना दरवर्षी 10 हजार रुपये देणार म्हणजे देणारच; उद्धव ठाकरेंचं आश्वासन https://t.co/gkSVUsjAdg @ShivSena @uddhavthackeray
— थोडक्यात (@thodkyaat) October 11, 2019
Comments are closed.