“…तर उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढवावी”

“…तर उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढवावी”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही तर त्यांना माझ्या कोट्यातून उमेदवारी देईन, असं भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते टीव्ही9 च्या कार्यक्रमात बोलत होते.

आमच्यात याबाबतची बोलणीही झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आठवले यांना साताऱ्याची जागा हवी आहे तेथे उदयनराजेंना उमेदवारी देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

शिवसेना आणि भाजपची युती झाली तर मला रिपाईसाठी 2 जागा हव्या आहेत. एक शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची जागा हवी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. उदयनराजे जनतेच्या पसंतीचे खासदार समजले जातात.

महत्वाच्या बातम्या-

-“एरवी एकमेकांचे ‘चेहरे’ न पाहणारे महाआघाडी करतायेत”

-“सेहगल यांना न बोलावल्यानं महाराष्ट्राचं नाक कापलं गेलं”

-…तर पुन्हा बॅट हातात घेणार नाही- विराट कोहली

-नरेंद्र मोदी स्वत:ची तुलना वाजपेयींशी करतात ही मोठी शोकांतिका- एम.के.स्टॅलिन

-CBI संस्था संकटात; 3 राज्यांनी घातली बंदी, इतरही बंदीच्या तयारीत

Google+ Linkedin